कोकण रेल्वे उभारणीवेळी प्राण गमावलेल्यांना आदरांजली

रत्नागिरी : कोकण रेल्वेचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा, रत्नागिरी जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, कोकण रेल्वेचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासह अनेकांकडून कोकण रेल्वेच्या उभारणीच्या कामादरम्यान प्राण गमावलेल्यांना सोमवारी आदरांजली वाहण्यात आली.

दरवर्षी स्मृतिदिनाचे औचित्य साधून या दिवशी रत्नागिरीतील ‘श्रमशक्ती स्मारक’ येथे कोकण रेल्वेच्या उभारणीच्या कामादरम्यान आपले प्राणांचे बलिदान देणाऱ्या कामगार अभियंते तसेच अधिकारी यांना आदरांजली वाहिली जाते. येथील रेल्वे स्थानकासमोर स्मृती स्तंभ येथे हा आदरांजली वाहणारा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:15 18-10-2024