रत्नागिरी : संचार निगम एक्झिक्युटिव्ह असोसिएशन (SNEA) बीएसएनएल रत्नागिरी शाखेची नुकतीच सर्वसाधारण सभा पार पडली. या सभेत श्री. नंदकिशोर गुणाजी कदम यांची जिल्हा सचिवपदी पुन्हा एकदा निवड करण्यात आली. तसेच, श्री. स्वानंद सुरेश मयेकर यांची जिल्हाध्यक्ष म्हणून नवनियुक्ती करण्यात आली.
गेली सहा वर्षांपासून जिल्हा सचिव म्हणून कार्यरत असलेले नंदकिशोर कदम हे बीएसएनएल रत्नागिरी जिल्ह्यातील अधिकाऱ्यांच्या विविध तक्रारींचे निवारण करण्यासाठी काम करत आहेत. गेल्या २५ वर्षांपासून ही संघटना एचआर, प्रशासन आणि कर्मचाऱ्यांच्या इतर तक्रारी सोडवण्यासाठी कार्यरत आहे.
महाराष्ट्र परिमंडळाचे सचिव श्री. समीर खरे आणि कोकण विभागाचे सचिव श्री. सुजित कदम यांच्या उपस्थितीत ही सभा रत्नागिरीतील बीएसएनएलच्या सर्व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडली. नंदकिशोर कदम आणि स्वानंद मयेकर यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:11 06-08-2025














