मंडणगड : मंडणगड येथील कनिष्ठ न्यायालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन अखिल भारतीय अधिवक्ता परिषदेचे मार्गदर्शक आणि महाराष्ट्र गोवा बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष अॅड. पारिजात पांडे यांनी नुकताच मंडणगड तालुक्याचा दौरा केला. तसेच, न्यायालयाच्या इमारतीची पाहणी केली.
यावेळी भाजपचे माजी तालुकाध्यक्ष अप्पासाहेब मोरे, यश मेहता, गिरीश जोशी, मकरंद रेगे, मंडणगड तालुका बार असोसिएशनतर्फे अध्यक्ष अॅड. मिलिंद लोखंडे, अॅड. सचिन बेर्डे, अॅड. आदित्य सुळे, अॅड. सुमेश घागरुम अॅड. धनंजय करमरकर व सहकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. दौऱ्याचे निमीत्ताने श्री. पांडे यांनी कनिष्ठ न्यायालय भिंगळोली येथे मंडणगड तालुका बार असोसिएशनचे सर्व पदाधिकाऱ्यासमवेत चर्चा केली.
न्यायालयाचे इमारतीचे कामकाज व उद्घाटन सोहळ्याची तयारी यांचा आढावा घेतला. या दौऱ्यात त्यांच्यासमवेत रायगड जिल्ह्यातील सरकारी वकील व रायगड जिल्हा अधिवक्ता परिषदेचे अध्यक्ष अॅड. संतोष पवार, रत्नागिरीचे सरकारी वकील अॅड. अनिरुद्ध फणसेकर, रत्नागिरी जिल्हा अधिवक्ता परिषदचे महामंत्री चिपळूण येथील अॅड. मिलिंद तांबे, खेड येथील अॅड. सिद्धेश बुटला, मुख्याधिकारी अभिजित कुंभार आदी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:15 PM 06/Aug/2025














