पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने घेतलेल्या डी.एल.एड. परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. राज्यातील १३ हजार ५२६ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. त्यातील नऊ हजार दोन विद्यार्थी म्हणजेच ६४.७५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
राज्य परीक्षा परिषदेमार्फत डी.एल. एड. परीक्षा ३ ते १२ जून २०२५ या कालावधीत घेण्यात आली. परीक्षेचा निकाल परिषदेच्या ‘www. mscepune.in’ या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला. विद्यार्थ्यांना निकालाचे मूळ गुणपत्रक संबंधित अध्यापक विद्यालयामार्फत लवकरच मिळणार आहे. उत्तरपत्रिकेची गुणपडताळणी आणि उत्तरपत्रिकेची छायाप्रत मागणीसाठी २० ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार असल्याचे परीक्षा परिषदेने स्पष्ट केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:43 PM 06/Aug/2025














