रत्नागिरी : जिल्ह्यात जुलैअखेर ५ लाखांहून अधिक रेशनकार्डधारकांनी ई-केवायसी पूर्ण केली आहे. आता मशीनद्वारे ई-केवायसी करण्याची मुदत संपली असली तरीही मेरा केवायसी आणि आधार फेस आरडी सर्व्हिस अॅप या द्वारे ई-केवायसी करता येणार आहे. जिल्ह्यातील ६६ जणांनी एकाच दिवशी ई-केवायसी केली आहे. अजूनही २ लाख ७० हजार १०८ कार्डधारकांनी ई-केवायसी केलेली नाही.
जिल्ह्यासह राज्यभरात रेशन दुकानांसाठी ई-केवायसी काम महत्त्वाचे आहे. केवायसी करण्यासाठी ३१ जुलैपर्यंत मुदत होती. त्यामुळे जिल्ह्यात तब्बल ५ लाखांहून अधिक रेशनधारकांनी ई-केवायसी पूर्ण केली आहे तर २० हजारांहून अधिक जणांची ई-केवायसी रद्द केली. तर ३ लाख ६६ हजार ७२८ आधार पडताळणी प्रलंबित आहे. शासनाने यापूर्वदिखील ई-केवायसीसाठीची मुदत दिली होती.
दोन ते तीनवेळा मुदतवाढ देऊनही कार्डधारकांकडून अपेक्षिप्त प्रतिसाद मिळत नसल्याने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात ई-केवायसी अजून प्रलंबित आहे. शासनाने कारवाईला सुरुवात केली नसली तरी ज्याची ही प्रक्रिया अपूर्ण आहे, त्या कार्डधारकांचे धान्य बंद होणार आहे. त्यामुळे कार्डधारकांनी लवकरात लवकर मोबाईल अॅपद्वारे ई-केवायसी पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हा पुरवठा विभागाने केले आहे.
रेशनकार्डधारकांनो, ई-केवायसीची मुदत संपली आहे. शासनाच्या वतीने अद्याप मुदतवाढीची तारीख आलेली नाही. तरीही मोबाईल अॅपद्वारे ई-केवायसी होत आहे- रोहिणी रजपूत, जिल्हा पुरवठा अधिकारी, रत्नागिरी
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:51 PM 06/Aug/2025














