साखरपा : कोकण रेल्वेमध्ये कार्यरत असलेले कोंडगाव-साखरपामधील असलेले लोकोपायलट सुनील कीर यांचा गोवा येथे पार पडलेल्या सीएमडी लेव्हल ग्रुप यांच्या वतीने सन्मान कार्यक्रमात विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले. २९ सप्टेंबरला २०२३ या दिवशी कोकण रेल्वे मार्गवरील रत्नागिरी ते मडगाव या प्रवासादरम्यान नारळाचे झाड कोसळले होते. याचदरम्यान मत्स्यगंधा एक्स्प्रेस या मार्गावर धावत होती. या गाडीचे लोको पायलट सुनील कीर व त्यांचे सहकारी निमिष कदम यांनी प्रसंगावधान दाखवत इमर्जन्सी ब्रेक कार्यरत करत संभाव्य अपघातापासून अनेकांचे प्राण वाचविले होते. त्यामुळे त्यांच्या कार्याचा गौरव कोकण रेल्वेचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संतोषकुमार झा यांच्या वतीने करण्यात आला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:05 PM 18/Oct/2024








