खेड : प्री-पेड मीटर सक्ती त्वरित बंद करण्यासाठी ‘मनसे’कडून महावितरण कंपनीला निवेदन

खेड : नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष तथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली प्री-पेड मीटर सक्ती त्वरित बंद करण्यासाठी कार्यकारी अभियंता महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनी (ता. खेड) यांना निवेदन देण्यात आले आणि चुकून संबंधित कंपनीची माणसे विनापरवानगी प्री-पेड मीटर बसवताना आमच्या निदर्शनास आल्यास त्यांचा गाल आणि आमचा हात असेल, असा थेट इशारा मनसेकडून देण्यात आला आहे.

मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी पावसाळी अधिवेशनात जाहीर केल्याप्रमाणे घरगुती वीज ग्राहकांना प्री-पेड मीटर लावता येणार नाही. खेड तालुक्यात विज बिल भरणा १०० टक्के वसूली असताना मुख्यमंत्री विधिमंडळातील घोषणेला छेद देणारे काम खेड तालुक्यात सुरू आहे. प्री-पेड मीटर बसविण्याचा ठेका घेतलेल्या कंपन्या घरात जाऊन जबरदस्तीने, दमदाटी करून इतकेच नव्हे तर जी घरे बंद आहेत अशा घरात परस्पर घुसून मिटर बसवित आहेत. त्यामुळे तालुक्यात असंतोषाचे वातावरण असून त्याचा कधीही भडका उडू शकतो.

याच अनुषंगाने खेडमध्ये खेड नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष तथा मनसे राज्य सरचिटणीस यांच्या नेतृत्वाखाली प्री-पेड मीटर सक्ती त्वरित बंद करण्यासाठी कार्यकारी अभियंता महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनी यांना निवेदन देण्यात आले आहे. चुकून संबंधित कंपनीची माणसे विनापरवानगी प्री-पेड मीटर बसवताना आमच्या निदर्शनास आल्यास त्यांचा गाल आणी आमचा हात असेल असा थेट इशारा मनसेकडून देण्यात आला आहे.

या प्रसंगी खेड नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष तथा मनसे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर, मनसे तालुकाध्यक्ष निलेश बामणे, खेड शहराध्यक्ष ऋषिकेश कानडे, भालचंद्र (नंदू) साळवी, मनविसे तालुकाध्यक्ष गणेश बेलोसे, स्वरूप माजलेकर, मिलिंद (दादू) नांदगावकर, राहुल पाटणे, प्रदीप भोसले, मनोज दांडेकर, अंकुश शिंदे, प्रदीप भोसले, मनसे प्रसिद्धी माध्यम प्रमुख सर्वेश पवार, प्रशांत बारटक्के यांच्यासह महाराष्ट्र सैनिक, कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:02 PM 06/Aug/2025