सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर

रत्नागिरी : राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले जिल्हा दौऱ्यावर येत असून, त्यांचा सविस्तर दौरा पुढीलप्रमाणे आहे.

गुरूवार ७ ऑगस्ट, २०२५ सायंकाळी ४ ते ४.३० वाजता कशेडी बोगदा, राष्ट्रीय महामार्ग सा.बां. विभाग पॅकेज-३ ची पाहणी (९ किमी). ४.३० ते ५ वाजेपर्यंत कशेडी ते परशुराम, राष्ट्रीय महामार्ग सा.बां. विभाग पॅकेज-४ ची पाहणी (४२ किमी). सायंकाळी ५.०० ते ५.४५ वाजता परशुराम-चिपळूण-आरवली, राष्ट्रीय महामार्ग सा.बां. विभाग पॅकेज ५ ची पाहणी (३५ किमी). सायंकाळी ५.४५ ते ६.३० वाजता आरवली ते कांटे, राष्ट्रीय महामार्ग सा.बां. विभाग पॅकेज-६ ची पाहणी (४० किमी). ६.३० ते ७.०० पर्यंत कांटे ते हातखंबा, राष्ट्रीय महामार्ग सा.बां. विभाग पॅकेज ७ (१० किमी) व हातखंबा ते रत्नागिरी, राष्ट्रीय महामार्ग (१५ किमी) ची पाहणी. सोयीनुसार मोटारीने शासकीय विश्रामगृह, रत्नागिरीकडे प्रयाण. शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी येथे आगमन व मुक्काम.
शुक्रवार ८ ऑगस्ट, २०२५ रोजी सकाळी १० ते ११ वाजता राष्ट्रीय महामार्ग ६६ संदर्भात आढावा बैठक. (स्थळ – शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी) सकाळी ११ वाजता मोटारीने शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी येथून प्रयाण. सकाळी ११ ते ११.१५ वाजता रत्नागिरी ते हातखंबा (15 किमी). सकाळी ११.१५ ते १२.१५ पर्यंत
हातखंबा ते वाकेड, राष्ट्रीय महामार्ग सा.बां. विभाग पॅकेज ७ ची पाहणी (४० किमी). दुपारी १२.१५ वाजता ओणी-अणुस्कुरा घाट- कराड मार्गे जि. साताराकडे प्रयाण.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:01 06-08-2025