रत्नागिरी : तालुक्यातील कापडगाव-कोत्रेवाडी येथील बेपत्ता झालेल्या महिलेचा सांगाडा झरेवाडी येथील पठारावर सापडला.
पोलिसांकडे सांगाड्याच्या कपड्यावरून खात्री झाल्याची नोंद ग्रामीण पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. पूनम महादेव कोत्रे (वय ३८, रा. कापडगाव-कोत्रेवाडी, रत्नागिरी) असे मृत महिलेचे नाव आहे. ही घटना मंगळवारी (ता. ५) सकाळी सव्वादहाच्या सुमारास पेजे पठाराच्या खालच्या बाजूला झरेवाडी पठारावर निदर्शनास आली.
काही दिवसांपूर्वी पूनम कोत्रे ही महिला वेड्याच्या भरात घरात कोणालाही काहीही न सांगता निघून गेलेली होती. या बाबत तिच्या नातेवाईकांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात ती बेपत्ता झाल्याची खाबर दिली होती. तिचा शोध तपास सुरु असताना मंगळवार ५ ऑगस्ट रोजी सकाळी १०.१५ वा. सुमारास पेजे पठाराच्या खालच्या बाजूला झरेवाडी पठारावर एक मानवी सांगाडा मिळून आला. अंगावरील कपड्यांवरुन ती पूनम कोत्रे असल्याची खात्री पटली. या बाबत ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:18 07-08-2025














