रत्नागिरी : राज्यात वाळूची उपलब्धता कमी होत असल्याने तसेच भविष्यातील विकासासाठी वाळूची वाढती मागणी लक्षात घेता शासनाने एम-सँड (कृत्रिम वाळू) धोरणाला प्रोत्साहन देण्यासाठी नवीन धोरण जाहीर केले आहे.
या धोरणाच्या अंमलबजावणीसंदर्भात तसेच महसूल सप्ताहाच्या सांगता समारंभाच्या निमित्ताने गुरुवारी, दि. ७ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता रत्नागिरीच्या अल्पबचत सभागृहात चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
या चर्चासत्रात एम-सँड धोरणाची अंमलबजावणी, नवीन मानक कार्यप्रणाली, एम-सँडची आवश्यकता, युनिटधारकांना मिळणारे फायदे, एम-सँड युनिटसाठी आवश्यक परवानग्या आणि त्या कोणत्या विभागाकडून मिळतील यावर सविस्तर माहिती दिली जाईल.
जिल्ह्यातील क्रशर व्यावसायिकांनी या चर्चासत्रात उपस्थित राहून एम-सँड धोरणाविषयी माहिती घेण्याचे आवाहन जिल्हा खनिकर्म अधिकारी भा. न. जोशी यांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:31 07-08-2025














