हातखंबा-गुरववाडी येथे ट्रक कलंडला

रत्नागिरी : तालुक्यातील हातखंबा येथे वाहनांच्या अपघात सत्र सुरूच आहे. बुधवारी (ता. ६) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास हातखंबा-गुरववाडी रस्त्यावर ट्रकवरील चालकाचा ताबा सुटून सोळाचाकी ट्रक रस्त्याच्या बाजूला जाऊन कलंडला. मात्र कोणतीही जीवितहानी झाली नाही.

मात्र अपघातग्रस्त ट्रक संबंधित स्वतःहून काढून नेणार असल्याची माहिती मिळत आहे. सायंकाळी उशिरा घडलेल्या घटनेनंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते अपघाताची नोंद ग्रामीण पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:49 AM 07/Aug/2025