रत्नागिरी : शहरातील धनजी नाका बेलबाग परिसरात एका घरातून पोलिसांनी १९ लिटर गावठी हातभट्टीची दारू जप्त केली आहे. याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या तक्रारीवरून एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना ६ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी १ वाजून ३० मिनिटांनी घडली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेत कार्यरत असलेले पोलीस हवालदार बाळ रमेश पालकर (वय ४५) यांना मिळालेल्या माहितीनुसार, त्यांनी धनजी नाका बेलबाग येथील एका घराच्या पाठीमागील बाजूस छापा टाकला.
या छाप्यात सचिन सुरेश गुरव (वय ५०, रा. झारणी रोड, रत्नागिरी) याच्या ताब्यातून बेकायदेशीर आणि विनापरवाना बाळगलेली हातभट्टीची दारू आढळून आली. पोलिसांनी एकूण २,१०० रुपये किमतीची १९ लिटर गावठी हातभट्टीची दारू जप्त केली आहे.
या प्रकरणी ६ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी २ वाजून ५७ मिनिटांनी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. क्र. ३४२/२०२५ नुसार महाराष्ट्र दारुबंदी कायदा, कलम ६५(ई) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:54 07-08-2025














