रत्नागिरी : शहरातील खेडशी, चंदसूर्या येथील महालक्ष्मी ट्रेडर्सजवळील माडी विक्री दुकानाजवळ एका व्यक्तीकडे बेकायदेशीरपणे देशी आणि विदेशी दारूच्या बाटल्यांचा साठा आढळून आला आहे. या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या तक्रारीवरून पोलिसांनी एका आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.
ही घटना ६ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी २ वाजून २० मिनिटांनी घडली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस हवालदार भैरवनाथ ब्रह्मदेव सवाईराम (वय ३९) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, पोलिसांनी महेश रमेश चव्हाण (वय ४५, रा. कारवांचीवाडी, रत्नागिरी) याच्या ताब्यातून विविध प्रकारच्या दारूच्या बाटल्या जप्त केल्या.
जप्त केलेला मुद्देमाल:
मॅकडॉल नंबर वन व्हिस्की: १८० मिलीच्या ७ काचेच्या बाटल्या, एकूण किंमत १,१२० रुपये.
डीएसपी ब्लॅक व्हिस्की: १८० मिलीच्या ८ काचेच्या बाटल्या, एकूण किंमत १,१२० रुपये.
जीएम संत्रा दारू: १८० मिलीच्या ७ प्लास्टिकच्या बाटल्या, एकूण किंमत ५६० रुपये.
देशी संत्रा दारू: ९० मिलीच्या ७ प्लास्टिकच्या बाटल्या, एकूण किंमत २८० रुपये.
ओल्ड मंक रम: ९० मिलीच्या ७ प्लास्टिकच्या बाटल्या, एकूण किंमत ५२५ रुपये.
पोलिसांनी एकूण ३,६०५ रुपये किमतीचा दारूसाठा जप्त केला आहे. आरोपी महेश चव्हाण याने दारूचा साठा बेकायदेशीर आणि विनापरवाना आपल्या ताब्यात ठेवला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.
या प्रकरणी ६ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजून १ मिनिटांनी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. क्र. १५५/२०२५ नुसार महाराष्ट्र दारू बंदी कायद्याच्या कलम ६५ (ई) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:02 07-08-2025














