दापोली : दारू पिण्यासाठी पत्नीने पैसे देण्यास नकार दिल्याने एका व्यक्तीने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना दापोली तालुक्यातील नवानगर, माटवण येथे घडली आहे. उपचारासाठी दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
ही घटना ६ ऑगस्ट २०२५ रोजी घडली. रणजित हनुमंत कदम (वय ४६, रा. नवानगर, माटवण) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रणजित कदम यांनी पत्नीकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. पत्नीने पैसे देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या रणजित कदम यांनी घराजवळील बेडकोनच्या विहिरीत उडी मारली.
आपल्या वडिलांनी विहिरीत उडी मारल्याचे समजताच त्यांचा मुलगा सार्थक याने तातडीने त्यांना विहिरीतून बाहेर काढले. गंभीर अवस्थेत त्यांना तातडीने दापोली येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर त्याच दिवशी दुपारी १ वाजून १३ मिनिटांनी त्यांना मृत घोषित केले.
या प्रकरणी दापोली पोलिसांनी आकस्मिक मृत्यू क्रमांक ५६/२०२५ नुसार बी.एन.एस.एस १९४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:02 07-08-2025














