देवरूख : वाहनांची वाढती संख्या, अरुंद रस्ते, रस्ता रुंदीकरणाला होणारा विरोध आणि कुठेही लावण्यात येणारी वाहने यामुळे सध्या देवरूख परिसरात वाहतूककोंडी होत आहे. बसस्थानक ते माणिक चौक, ग्रामीण रुग्णालय या परिसरात फेरीवाले अथवा भाजीवाले आपली गाडी लावतात. त्यामुळे या रस्त्यावरून एखादे मोठे वाहन जाण्याएवढीही जागा शिल्लक राहात नाही. देवरूख परिसरात वाहतूककोंडी मोठ्या प्रमाणात होते. यावर उपाययोजना करण्यात नगरपंचायत व पोलिस प्रशासन अपयशी ठरले आहे.
गेली तीन वर्षे देवरूखच्या बाजारपेठेतील ग्राहकांना मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडीला सामोरे जावे लागत आहे. आधीच रस्ता अरुंद त्यातच प्रत्येक दुकानाच्या समोर लावले जाणारे फलक व माल यामुळे छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून ते अगदी माणिक चौकापर्यंत असणाऱ्या बाजारपेठेत रोजच गर्दी असते. रविवारचा दिवस हा आठवडा बाजाराचा असल्याने बाजारात पाऊल ठेवायला जागा नसते. बाजारातील व्यापाऱ्यांसाठी माल घेऊन येणारे ट्रक रस्त्यातच उभे केले जातात.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:26 AM 07/Aug/2025














