Trump put extra tariff on India वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर अतिरिक्त 25 टक्के टॅरिफ लादण्याची घोषणा केली आहे. ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी भारतावर 25 टक्के टॅरिफ लादणार असल्याचं म्हटलं होतं.
त्यामुळं अमेरिकेनं भारतावर लादलेल्या टॅरिफची टक्केवारी आता 50 टक्क्यांवर पोहोचली आहे. भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्यानं चिडलेल्या ट्रम्प यांनी भारतावर अतिरिक्त 25 टक्के टॅरिफ लादण्याची घोषणा केली आहे.
भारतावर आता अमेरिकेनं 50 टक्के टॅरिफ लादलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ संदर्भातील कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केली आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक शैलेंद्र देवळाणकर यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचा हा निर्णय पक्षपाती स्वरुपाचा निर्णय आहे, असं म्हटलं. ट्रम्प यांचा एकतर्फी व्यवहार प्रतिबिंबीत होतं. भारताच्या रशियाच्या व्यापारावर ट्रम्प यांचा आक्षेप आहे तर यूरोपियन यूनियनचा रशियासोबत भारतापेक्षा अतिरिक्त व्यापार आहे. चीन भारतापेक्षा अधिक तेल रशियाकडून खरेदी करतोय. त्यांच्यावर इतका दंड लादलेला नाही. मात्र, भारतावर दबाव टाकण्याचा ट्रम्प यांचा पर्यत्न असल्याचं देवळाणकर यांनी म्हटलं आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:51 07-08-2025














