रत्नागिरी : जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांत श्वान, सर्प आणि विंचूदंशाचे तब्बल ४६ हजार प्रकार नोंदले गेले आहेत. त्यामध्ये दुर्दैवाने एक व्यक्ती श्वानदंशाने दगावली. जिल्ह्यातील विविध प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये या प्रकारांची नोंद झाली आहे. ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या ५ वर्षांत सर्प, विंचू आणि श्वानदंश झालेल्या व्यक्तींची संख्या वाढत आहे. २०२० मध्ये श्वानदंशाचे ४ हजार ६२७ जण रुग्ण आहेत.
त्यामध्ये यावर्षी एक जण दगावला आहे. २०२२ मध्ये ४ हजार ३११, २०२३ मध्ये ३ हजार ४५ आणि गतवर्षी २०२४ मध्ये २ हजार १६५ असे ५ वर्षांत १८ हजार ३१७व्यक्तींना श्वानदंश झाल्याचे आकडेवारीत स्पष्ट झाले आहे. दुसरीकडे ग्रामीण भागांत सर्रास विंचूदंशाचे प्रमान अधिक असते. त्यानुसार ५ वर्षांत तब्बल २३ हजार ३९४ व्यक्तींना विंचूदंश झाला. २०२० मध्ये ६ हजार ५०९, २०२१ मध्ये ६ हजार ८५७, २०२२ मध्ये ४ हजार १४८, २०२३ मध्ये ३ हजार ९६३, २०२४ मध्ये २ हजार ९१७जणांना विंचूदंश झाला.
जिल्ह्यात ५ वर्षात सर्पदंशामुळे सुमारे ४ हजार ३६६ व्यक्तींना उपचार घ्यावे लागले. २०२०चा विचार करता ९१९, २०२१ मध्ये १ हजार १९०, २०२२ मध्ये १ हजार ६२, २०२३ मध्ये ७०९ आणि २०२४ मध्ये ४८६, असे ४३६६ व्यक्तींना सर्पदंश झाला. ही आकडेवारी ग्रामीण भागातील आहे.
जिल्हा रुग्णालयातील आकड्यांचा तपशील अधिक असेल. ही एकूण आकडेवारी ४६ हजार ७७ इतकी आहे. सर्प, विंचू आणि श्वानदंश झालेल्या व्यक्तींवरती उपचार करण्यासाठी त्या त्या प्रकारची लस (इंजेक्शन) आवश्यक असतात. ती सध्या बेताचीच आहेत. त्यांचा पुरेसा पुरवठा शासनाने करावा, अशी मागणी नेहमीच होत असते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:29 PM 07/Aug/2025












