लांजा पोलिस ठाण्यातर्फे निबंध, चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

लांजा : विशेष पोलिस महानिरीक्षक व महिला बाल अपराध प्रतिबंधक विभाग महाराष्ट्र, मुंबई यांच्या सूचनेनुसार व लांजा पोलिस ठाण्याच्या वतीने तालुकास्तरीय प्राथमिक, माध्यमिक शाळा व महाविद्यालय विद्यार्थ्यांसाठी नुकत्याच घेण्यात आलेल्या चित्रकला व निबंध स्पर्धा तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात झाल्या.

स्पर्धेबाबत लांजा पोलिस ठाण्याच्या वतीने तालुक्यातील प्रत्येक शाळा व महाविद्यालयांना पत्राद्वारे माहिती देण्यात आली होती. स्पर्धा इयत्ता पाचवी ते सातवी, इयत्ता आठवी ते दहावी व इयत्ता अकरावी ते बारावी अशा तीन गटांमध्ये घेण्यात आली. गट इयत्ता पाचवी ते सातवी चित्रकला स्पर्धा प्रथम क्रमांक वेदांती वीर, द्वितीय वैष्णवी आगळे, तृतीय अर्जुन कदम, उत्तेजनार्थ स्वराली नेवरेकर, गट आठवी ते दहावी निबंध स्पर्धा प्रथम प्रीती निबदे, द्वितीय सृष्टी मणचेकर, तृतीय पूजा राणीम, उत्तेजनार्थ अभय कुष्टे, गट इयत्ता अकरावी ते बारावी निबंध स्पर्धा प्रथम स्वप्नाली कुंभार, द्वितीय सानिका नमसले, तृतीय तृप्ती गोसावी, उत्तेजनार्थ सानिका धुळप या विद्यार्थ्यांनी सुयश प्राप्त केले आहे.

विजेत्या स्पर्धकांना बक्षीस वितरण समारंभ कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी कळवण्यात येईल, असे आवाहन लांजा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नीळकंठ बगळे यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:36 PM 18/Oct/2024