ग्राहकांना विश्वासात घेऊनच स्मार्ट मीटर बसवा; उबाठा ठाकरे गटातर्फे निवेदन

गणपतीपुळे : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीमार्फत सध्या राज्यात स्मार्ट मीटर बसवणे चालू आहे. हे स्मार्ट मीटर बसवायचे असल्यास घर मालकाला सर्व माहिती सांगून, विश्वासात घेऊनच जर घर मालकाची परवानगी असेल तर बसवावा, मीटर बसवण्यास कोणतीही जबरदस्ती करू नये, अशा आशयाचे निवेदन महावितरण कंपनीचे खंडाळा येथील सहायक अभियंता साईराज नागवेकर यांच्याकडे नुकतेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे देण्यात आले आहे.

यावेळी उपतालुका प्रमुख प्रकाश जाधव, विभागप्रमुख संतोष हळदणकर, उपविभाग प्रमुख हेमंत किरडवकर व सहदेव वीर, माजी विभागप्रमुख तुषार चव्हाण, कळझोंडीचे शाखा प्रमुख शांताराम वीर, शिवसेना कार्यकर्ते प्रकाश खेडेकर, अनंत अवेरे, सुधाकर महाकाळ, चंद्रकांत पवार, रमेश सावंत, अमोल भुवड, प्रविण मेस्त्री, वैभव मेस्त्री, शेखर भडसावळे, प्रकाश पिंपळे आदी उपस्थित होते.

याप्रसंगी ठाकरे गटाचे प्रमुख पदाधिकारी व खंडाळा वीज वितरण कार्यालयाचे सहायक अभियंता साईराज नागवेकर यांच्यामध्ये खंडाळा परिसरातील घराघरांमध्ये स्मार्ट मीटर बसविण्याच्या अंमलबजावणीबाबत विशेष चर्चा करण्यात आली. या चर्चेअंती खंडाळा येथील वीज वितरण कार्यालयाचे सहायक अभियंता साईराज नागवेकर यांनी आपण योग्य ते सहकार्य करून स्मार्ट मीटरबाबत जनजागृती मोहीम राबवू, असे आश्वासन देण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:56 PM 07/Aug/2025