संगमेश्वरात ५९१ व्यक्तींवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया

देवरुख : शासनाच्या राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमात संगमेश्वर तालुक्यामध्ये ५९१ व्यक्तींवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया गतवर्षामध्ये करण्यात आल्या आहेत. तालुक्याने मिळालेल्या उद्दिष्टापेक्षा जास्त शस्त्रक्रिया करून १००% च्या वर काम केले आहे.

प्रतिवर्षी शासनाच्या आरोग्य विभागाकडून प्रत्येक तालुक्यातील आरोग्य विभागाला मोतीबिंदू शस्त्रक्रिया उद्दिष्ट दिले जाते. यानुसार आरोग्य कर्मचारी प्राथमिक व उप प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरातील ग्रामस्थांची तपासणी करून डोळ्यांच्या समस्या असलेल्या रुग्णांना प्रत्यक्ष डोळे तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयाकडे रवाना करत असतात.

या ठिकाणी तपासणीतून मोतीबिंदू झाला असल्याचे स्पष्ट झाल्यावर अशा मोतीबिंदू झालेल्या रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यासाठी प्रवृत्त केले जाते. गतवर्षी तालुक्याला शासनाकडून ४९८ शस्त्रक्रियांचे उद्दिष्ट दिले होते. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गोविंद मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य कर्मचाऱ्यांनी काम करताना दिलेल्या उद्दिष्टापेक्षाही जास्त मोतीबिंदू रुग्ण शोधून शस्त्रक्रिया करण्यात आल्या.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:19 PM 07/Aug/2025