रत्नागिरी : कोळंबेत दुग्धजन्य पदार्थ बनविण्याचे प्रात्यक्षिक

पावस : दापोली डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांतर्गत दापोली येथील कृषी महाविद्यालयातर्फे ग्रामीण जागरुकता कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत रत्नागिरी तालुक्यातील कोळंबे गावात विद्यार्थ्यांच्या मृदासूत गटाने विविध दुग्धजन्य पदार्थ बनविण्याचे प्रात्यक्षिक सादर केले. प्रात्यक्षिकास ३५ उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. या महिलांनी या प्रात्यक्षिकामध्ये पनीर, लस्सी, सुगंधी दूध (फ्लेवर्ड मिल्क), पनीर बनविण्याच्या प्रक्रियेतून उत्पन्न झालेल्या निवळीचे पेय बनविण्याच्या पाककृतींचा समावेश होता.

सार्थक दिवाळे याने स्वागत केले. कु. राजवर्धन गायकवाड याने घरच्या घरी पनीर बनविण्याची प्रक्रिया समजावून सांगितली. संकेत देशपांडे व प्रणव देसाई यांनी पनीर बनविण्याचे प्रात्यक्षिक सादर केले. ओंकार फराडे याने लस्सी बनविण्याची प्रक्रिया समजावून सांगितली. लस्सी तयार करण्याचे प्रात्यक्षिक वेदांत गिरी व सुमित भादवे यांनी करून दाखवले. आकाश गावडे याने सुगंधी व्हॅनिला दूध बनविण्याची पाककृती सादर केली. या नंतर कु. विजय दराडे आणि विपूल डोंगरकर यांनी व्हॅनिला दूध बनविण्याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक सादर केले. प्रणव देसाई यांनी पनीर प्रक्रियेत उत्पन्न होणाऱ्या निवळीचे महत्त्व सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:45 PM 07/Aug/2025