गणपतीपुळे : रत्नागिरी तालुक्यातील कळझोंडी तिसंग बौद्धवाडी ते धरण मार्गावर रत्नागिरी येथून येणाऱ्या एस.टी. बस व जयगड येथून कळझोंडी मार्गे जाणा-या गाड्यांना यू टर्न (वळणावर) गाडी फिरवताना मोठ्या प्रमाणात तारेवरची कसरत करावी लागते.
हे वळण धरण मार्गावर असून ते अरुंद असल्याने मोठ्या अपघाताची शक्यता वर्तवली जात आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या अखत्यारित येथील रस्त्याचे काम करण्यात आले असून यू टर्न वळण अतिशय लहान असल्याने या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या सर्वच लहान मोठ्या वाहन चालकांना आणि विशेषतः एसटी महामंडळाच्या चालकांना तारेवरची कसरत करावी लागते. त्यामुळे संबंधित वाहन चालकांचे नियंत्रण सुटून धोका उद्भवणाची भीती व्यक्त केली जात आहे.
त्यामुळे या धरण मार्गावरील धोकादायक वळण लक्षात घेऊन संबंधित खात्याने सदर वळण मोठ्या आकाराचे करण्यासाठी गांभीर्यान कार्यवाही हाती घ्यावी, अशी जोरदार मागणी स्थानिक ग्रामस्थ, प्रवासी, पर्यटक व वाहतूकदार यांच्याकडून केली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:52 PM 07/Aug/2025












