संगमेश्वर : राजापूर तालुक्यात पावसाळ्यात उगवणारी, एक अतिदुर्मीळ आणि इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्व्हेशन ऑफ नेचरच्या धोक्यात असलेल्या प्रजातीच्या रेडलिस्टमध्ये ‘अतिधोकाग्रस्त’ या वर्गवारीत असलेली ‘अपोनोजेटॉन नटेशी’ नावाची एक पाणवनस्पती आढळते. या वनस्पतीचे साताऱ्यात आढळणाऱ्या ‘वाय’ तुऱ्याशी जरी साधर्म्य आढळत असले तरी औरंग यादव आणि अरुण चांदोरे यांनी केलेल्या शास्त्रशुद्ध अभ्यासामुळे ही प्रजाती पूर्णपणे वेगळी असून, तिला हंसतुरा’ असेही म्हटले आहे.
केंद्र सरकारच्या जैवतंत्रज्ञान विभागाचे माजी सल्लागार डॉ. एस. नटेश यांच्या नावावरून या वनस्पतीला अपोनोजेटॉन नटेशी हे नाव दिले गेले. महाराष्ट्रात फक्त राजापूर पट्टयात ही प्रजाती अतिशय थोड्या जागेपुरती मर्यादित आहे. देशात फक्त तीन ठिकाणी म्हणजे महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकात याचा आढळ आहे आणि तेही अत्यंत थोड्या प्रमाणात. अत्यंत प्रदेशनिष्ठ असल्याने जर का या प्रजातीचे संरक्षण आणि संवर्धन झाले नाही तर ही पूर्णपणे नष्ट होऊ शकते.
ही प्रजाती दोन ते अडीच मीटर खोल पाण्यातच वाढते. पाण्याखाली याचा कांदा वाढतो, पानेही पाण्यातच असतात. देत दोन-एक मीटर वाढून पाण्याच्या वर याचा तुरा येतो, तो हंसपक्ष्याच्या चोचीसारखा दिसतो, त्यामुळे त्याला ‘हंसतुरा’ म्हटले जाते. या तुऱ्यावर ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात छोटी छोटी फुले येतात आणि मग फळे धरतात; मात्र या वनस्पतीचे परागीभवन कसे होते या
विषयी अजूनही फारशी माहिती उपलब्ध नाही. सध्या हे तुरे, वापरून सोडून दिलेल्या खोल चिरेखाणीत साठलेल्या पाण्यात वाढले आहेत. पावसाळा संपल्यावर त्यातील पाणी आटल्यावर जर का त्या खाणीच्या मालकांनी पुन्हा ती चिरेखाण वापरात आणायचा निर्णय घेतला तर तिथून ही वनस्पती पूर्णपणे नष्ट होण्याचा धोका आहे.
कातळ सड्यांवर चाललेल्या भरमसाट बांधकामांमुळे इतर आहे. मात्र या हंसतुऱ्याइतक्या दुर्मीळ प्रजातीवर असे संकट येऊ नये म्हणून विशेष प्रयत्न करावे लागतील. रत्नागिरी जिल्हा हा जैवविविधतेच्या बाबतीत अत्यंत समृद्ध असा जिल्हा आहे. हे वैविध्य टिकवणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे आणि त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रामाणिक प्रयत्न करणे ही काळाची गरज आहे-नेत्रा पालकर आपटे, निसर्ग छायाचित्रकार व अभ्यासक
एका तळ्यात अस्तित्वात असलेली आपले हातपाय दूरवर पोचवू शकलेली आणि बहुतांश लोकांना हिची तोड ओळखदेखील नाही, असा हा अनोखा ‘हंसतुरा’ आहे. खोल पाण्यात वाढून पाण्यावर डोकावणारा पुष्पगुच्छ जवळून बघितला तर हंसाच्या मानेसारखा डौलदार दिसतो. सातारा वायतुऱ्याचा हा भाऊबंद, अतिशय दुर्मीळ, कधी कोणाच्या मनात आलं आणि या सोडलेल्या चिरेखाणीला भराव टाकून हॉटेल बांधावे की हंसतुऱ्याचा विषय संपलाच म्हणून कधी कधी वाटते वनस्पतींना पाय असते तर त्याही पळून गेल्या असत्या दूरवर- प्रतीक मोरे, निसर्ग अभ्यासक
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:45 PM 07/Aug/2025












