गणपतीपुळे येथे १२ ऑगस्ट रोजी अंगारकी चतुर्थी यात्रोत्सव

गणपतीपुळे : रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे येथे १२ ऑगस्ट रोजी अंगारकी चतुर्थी यात्रोत्सव होणार आहे. या पार्श्वभूमीवर नियोजनात्मक बैठक ७ ऑगस्ट रोजी गणपतीपुळे देवस्थानच्या सभागृहात सायंकाळच्या सुमारात रत्नागिरीचे तहसीलदार राजाराम म्हात्रे व प्रांताधिकारी जीवन देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.

यावेळी बारा रोजी होणाऱ्या अंगारकी चतुर्थी यात्रोत्सवाचे अतिशय चोख नियोजन करून सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना तहसीलदार व प्रांतधिकाऱ्यांनी दिल्या आहेत या बैठकीत गणपतीपुळे येथे अंगारकी यात्रा उत्सवाच्या निमित्ताने येणाऱ्या सर्व भाविकांना दर्शनाची व अन्य सर्व व्यवस्था अतिशय सुरळीतरित्या उपलब्ध होण्याच्या दृष्टीने तहसीलदार व प्रांताधिकारी यांनी गणपतीपुळे ग्रामपंचायत, देवस्थान समिती, पोलीस यंत्रणा, महावितरण, आरोग्य विभाग, आरटीओ, आपत्ती व्यवस्थापन विभाग, महसूल विभाग आदी यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

संपूर्ण मंदिर आणि गणपतीपुळे परिसरात भाविकांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अत्यंत नेटके नियोजन करण्याचे सूचना देण्यात आल्या आहेत . तसेच या निमित्ताने भाविकांच्या वाहनांची पार्किंग व्यवस्था करण्यासाठी गणपतीपुळे येथील सागर दर्शन पार्किंग, महालक्ष्मी हॉल आणि गणपतीपुळे खारभूमी मैदान या भागात पार्किंगची व्यवस्था करण्यात येणार आहे. या अंगारकीच्या पार्श्वभूमीवर गणपतीपुळे परिसरातील सर्व खड्डे बुजवण्याच्या भरून सूचना संबंधित बांधकाम विभागाला देण्यात आल्या आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:52 AM 08/Aug/2025