खेड : पन्हाळजे गावातील ग्रामीण व शहरी भागातील ग्रामस्थांनी नुकतीच राज्यमंत्री ना. योगेश कदम यांची भेट घेत विकासकामांबाबत सविस्तर चर्चा केली. यावेळी आयोजित बैठकीत गावाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध प्रस्ताव मंत्रीमहोदयांच्या समोर मांडण्यात आले. यावेळी तीन महत्त्वाच्या कामांना तत्काळ मंजुरी देण्यात आली.
यावेळी माजी आमदार व उपनेते संजय कदम, शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, बी. आर. नाचटे, सुभाष नाचरे (मुंबई) तसेच पन्हाळजे गावातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. गावाच्या विकासाच्या दृष्टीने आवश्यक कामांवर उपस्थितांनी मंत्रीमहोदयांशी चर्चा केली.
या बैठकीदरम्यान मंत्री योगेशदादा कदम यांनी ग्रामस्थांच्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देत गावाच्या प्राधान्यक्रमातील तीन महत्त्वाच्या विकासकामांना तत्काळ मंजुरी मिळावी यासाठी संबंधित विभागांना अधिकृत पत्र देत कार्यवाही सुरू करण्याचे निर्देश दिले.
या भेटीमुळे पन्हाळजे गावाच्या विकासाला नवे बळ मिळणार असून स्थानिक ग्रामस्थांमध्ये समाधान व उत्साहाचे वातावरण आहे. मंत्रीमहोदयांच्या तत्काळ निर्णय क्षमतेचे सर्वांनी अभिनंदन केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:02 AM 08/Aug/2025












