खेड : कळंबणी गावडेवाडीत आज महिला आरोग्य जनजागृती शिबिर

खेड : महिलांच्या आरोग्यविषयक समस्यांवर प्रभावी उपाय, मार्गदर्शन व जनजागृती करण्याच्या उद्देशाने मदत ग्रुप खेड व ग्रुप ग्रामपंचायत कळवणी यांच्या संयुक्त विद्यमाने ८ ऑगस्ट रोजी सकाळी ११ ते १ या वेळेत गावडेवाडी, कळंबणी येथील गणपती मंदिरात महिला आरोग्य जनजागृती शिबिराचे आयोजन केले आहे.

शिबिरात कॅन्सरमुक्त भारत अभियान, डायबिटीस मुक्त भारत अभियान, स्त्रियांच्या पाळीतील त्रासांपासून सुटका व गर्भाशय रक्षण, मातृत्व प्राप्तीसाठी उपाय, हार्ट अटॅक व कोलेस्ट्रॉलपासून मुक्ती, कंबरदुखी, गुडघेदुखी व स्पॉन्डिलायटिसवर शस्त्रक्रियेविना उपाय, वजन कमी करण्याचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. गावातील तसेच परिसरातील सर्व महिला, युवती व आरोग्याची काळजी घेणाऱ्या नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन मदत ग्रुप खेड व ग्रा.पं. कळंबणी यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:19 AM 08/Aug/2025