खेड : खेड, दापोली व मंडणगड तालुक्यांतील क्रीडा संकुलांच्या पायाभूत सुविधा, निधीचा विनियोग आणि खेळाडूंना आवश्यक सुविधा याबाबत सविस्तर आढावा घेण्यासाठी मंत्रालयात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्यमंत्री ना. योगेश कदम यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली.
या बैठकीत विभागीय अधिकारी, तिन्ही तालुक्यांचे तहसीलदार आणि तालुका क्रीडा अधिकारी सहभागी झाले होते. तिन्ही तालुक्यांतील क्रीडा संकुलांच्या उभारणीसाठी आधीपासून मंजूर निधीचा योग्य वापर सुनिश्चित करण्यावर बैठकीत भर देण्यात आला. मंत्रिमहोदयांनी व बैठकीत स्पष्ट निर्देश दिले की, खेळाडूंच्या प्रगतीसाठी दर्जेदार व सर्वसमावेशक क्रीडा सुविधा लवकरात लवकर उपलब्ध व्हाव्यात, मंजूर निधीचा विनियोग काळजीपूर्वक आणि नियोजनबद्ध पद्धतीने करावा, जेणेकरून ग्रामीण भागातील होतकरू खेळाडूंना दर्जेदार प्रशिक्षण व सुविधा मिळू शकतील. या बैठकीच्या माध्यमातून शासनाच्या ग्रामीण क्रीडा क्षेत्रातील सकारात्मक दृष्टिकोनाची आणि खेळाडूंना संधी उपलब्ध करून देण्याच्या प्रयत्नांची पुन्हा एकदा पुष्टी झाली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:22 AM 08/Aug/2025












