रत्नागिरी : सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेसाठी जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय समन्वय समिती गठीत

रत्नागिरी : पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या २० जूनच्या शासन निर्णयानुसार गणेशोत्सवात उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना शासनाकडून पुरस्कार देण्यासाठी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्या समन्वयाखाली जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय समन्वय समिती गठीत करण्यात आली आहे. गणेशोत्सव मंडळांच्या निवड प्रक्रियेत व पुरस्कारांच्या निवडीमध्ये पारदर्शकता राखण्यासाठी या समित्या काम करतील.

जिल्हास्तरीय समितीमध्ये उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन, जिल्हाधिकारी कार्यालय) हे अध्यक्ष, तर पोलिस उपअधीक्षक पोलिस मुख्यालय, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा प्रशासन अधिकारी, नगरपालिका प्रशासन शाखा, क्षेत्र अधिकारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, प्राचार्य, देवरुख कॉलेज ऑफ आर्ट अँड डिझाईन आदी सदस्य व जिल्हा नियोजन अधिकारी, सदस्य सचिव आहेत.
तालुकास्तरीय समितीमध्ये संबंधित तालुक्यांचे तहसीलदार अध्यक्ष, तर संबंधित तालुक्याचे गटविकास अधिकारी, पोलिस निरीक्षक, तालुका आरोग्य अधिकारी, मुख्याधिकारी नगरपंचायत, क्षेत्रीय अधिकारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, तालुक्यातील कलाशिक्षक हे सदस्य राहणार आहेत.

व स्पर्धेत सहभागी गणेश मंडळांना प्रत्यक्ष उत्सव स्थळी भेट देऊन मंडळांकडून व्हिडीओग्राफी कागदपत्रे जमा करून घ्यावीत. तालुक्यातील एक उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळाची शिफारस करुन त्याची सर्व कागदपत्रे व्हिडीओसह जिल्हा समितीकडे सादर करावीत. एक उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांची शिफारस करून त्यांची नावे, कागदपत्रे, व्हिडिओ सीडी-पी. एच. देशपांडे कला अकादमी, मुंबई येथे सादर करण्याची जबाबदारी जिल्हा समितीवर आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:47 PM 08/Aug/2025