लांजा : गुरांच्या गोठ्यात २७ वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

लांजा : गुरांच्या गोठ्यात गळफास लावून २७ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची घटना लांजा तालुक्यातील कणगवली शिंदेवाडी येथे आज गुरुवारी ७ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास घडली आहे. याबाबतची खबर पंकज पर्शुराम मांडवकर (वय ३१) याने लांजा पोलिसांना दिली. कणगवली शिंदेवाडी येथील प्रथमेश पर्शुराम मांडवकर (वय २० वर्षे) या तरुणाने आज गुरुवारी दुपारी २.३० च्या सुमारास घरापासून काही अंतरावर असणाऱ्या गुरांच्या गोठ्यात लाकडी वाशाला दोरीने गळफास लावून आत्महत्या केली.

यावेळी प्रथमेश मांडवकर याचे वडील लांजा येथे बाजारात गेले होते. तर आई घरी होती. भाऊ पंकज (वय ३१) हा येरवंडे येथे मजुरीसाठी गेला होता. दरम्यान, आत्महत्या केलेला प्रथमेश मांडवकर हा स्वभावाने शांत स्वभावाचा होता. तो गवंडी काम करत असे. मात्र त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. याबाबत अधिक तपास पोलीस करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:37 AM 08/Aug/2025