खेड उपविभागीय पोलिस अधिकारीपदी शैलेश सणस यांची नियुक्ती

खेड : सहायक पोलिस आयुक्त म्हणून बृहन्मुंबई येथे कार्यरत असलेले शैलेश दत्तात्रय सणस यांची खेड येथे उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. गुरुवारी सायंकाळी प्रशासनामार्फत त्यांची बदली करत अधिकृत आदेश जारी करण्यात आले.

शैलेश सणस यांना रत्नागिरी जिल्ह्यातील पोलिस प्रशासनाचा पूर्वानुभव आहे. त्यांनी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक म्हणून सुमारे सहा महिने कार्य केले असून, त्यानंतर जिल्हा विशेष शाखा, रत्नागिरी येथेही आठ महिने प्रभावीपणे काम पाहिले आहे. खेड उपविभागातील कायदा-सुव्यवस्था राखण्यासह गुन्हेगारी नियंत्रणावर लक्ष केंद्रित करण्याच्या दृष्टिकोनातून ही नियुक्ती महत्त्वपूर्ण मानली जात आहे. स्थानिक प्रशासन व नागरिकांमध्ये या नव्या अधिकाऱ्यांकडून सकारात्मक बदलांची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:42 AM 08/Aug/2025