रत्नागिरी : जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांचे वेध लागले असून, सध्या गट व गण रचनांबाबत हरकतींवर सुनावणी सुरू आहे. जिल्ह्यात ५० हरकती असून त्यावर कोकण आयुक्तांकडे नुकतीच सुनावणी झाली, याबाबत ११ ऑगस्टपर्यंत निर्णय अपेक्षित असून, त्यानंतर याबाबतचा अहवाल राज्य निवडणूक आयुक्तांकडे पाठविला जाणार आहे.
जिल्ह्यात प्राप्त झालेल्या हरकतींपैकी सर्वाधिक हरकती या जि.प. व पं.स. गटांच्या नाव बदलाबाबत आल्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचे पडघम वाजू लागले असून, नगर परिषदांसह जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रभाग रचनांच्या हरकती नोंदवण्यात आल्या आहेत.
जि.प. व पं.स. गट व गणांच्या रचनेबाबत जिल्ह्यातून ५० हरकती आल्या आहेत. या हरकती सुनावणीसाठी कोकण आयुक्तांकडे पाठवल्या आहेत. बुधवारी रत्नागिरी, रायगड व सिंधुदुर्ग जिल्ह्यात जि.प. व पं. स. गट आणि गणांबाबत आलेल्या हरकतींवर सुनावणी झाली. जिल्ह्यात आलेल्या ५० हरकतींपैकी ३५ एक हरकती या गट व गणांच्या नावात झालेल्या बदलांवरुन आल्या आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:49 AM 08/Aug/2025














