रत्नागिरी : राज्य परिवहन महामंडळातर्फे कागदी ओळखपत्राऐवजी स्मार्टकार्ड उपलब्ध करून देण्यात आले होते. मात्र, ही योजना बंद पडली असून, प्रवाशांना जुन्या कागदी ओळखपत्रावरच प्रवास करावा लागणार आहे. कागदी पास खराब होणे, गहाळ होण्याची भीती असल्यामुळे स्मार्टकार्डसाठी मागणी जोर धरत आहे.
राज्य परिवहन महामंडळातर्फे विविध घटकातील प्रवाशांना सवलती देण्यात येतात. त्यामध्ये ६५ वर्षांपुढील, ज्येष्ठ नागरिकांना तिकीटदरात ५० टक्के सवलत, ७५ वर्षांपुढील अमृत ज्येष्ठ नागरिकांना तिकीटदरात शंभर टक्के सवलत, अधिस्वीकृतीधारक माजी सैनिक, लोकप्रतिनिधी, विद्यार्थी यांना एसटीतून प्रवास पत्रकार, करताना तिकीटभाड्यात सवलत देण्यात येते. सवलत घेणाऱ्या लाभार्थी प्रवाशांना पूर्वी कागदी ओळखपत्र देण्यात येत होते.
मात्र, स्मार्टकार्ड योजनाच बंद पडल्यामुळे प्रवाशांना पुन्हा कागदीच पास वापरावे लागणार आहेत. कागदी पास खराब होणे, गहाळ होण्याची भीती असल्यामुळे स्मार्टकार्डसाठी मागणी जोर धरत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:11 PM 08/Aug/2025














