देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील देवरूख शहरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला असून, या कुत्र्यांच्या टोळीने शहरात उच्छाद मांडला आहे. दोघांना या कुत्र्यांनी चावा घेतला. मागील काही दिवसांपासून शहरात झुंडीने फिरणाऱ्या भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली आहे. हे कुत्रे रस्त्यावरून चालणाऱ्या नागरिकांचा तसेच वाहनांचा भुंकत जाऊन पाठलाग करत असल्याने वाहनचालक व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. नगरपंचायतीने भटक्या कुत्र्ऱ्यांचा वेळीच बंदोवस्त करण्याची मागणी नागरिकांमधून करण्यात आली आहे.
देवरूख शहरात ठिकठिकाणी भटक्या कुत्र्यांच्या झुंडी फिरत असल्याने त्याचा त्रास नागरिक व वाहनचालकांना होत आहे. रात्रीच्या वेळेस दुचाकीवरून जाणाऱ्या वाहनचालकांच्या अंगावर भटके कुत्रे भुंकत जात असल्याने अपघाताला निमंत्रण मिळत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:16 AM 08/Aug/2025












