मंडणगडातील कामांसाठी तहसील कार्यालयाबाहेर उपोषणाचा इशारा

मंडणगड : तालुक्यातील विविध समस्या मार्गी लावण्यात याव्यात, या मागणीसाठी मंडणगड येथील सामाजिक कार्यकर्ते राजेश गमरे यांनी स्वातंत्र्यदिनी भिंगळोली येथील तहसील कार्यालयाबाहेर उपोषणाचा इशारा प्रशासनाला दिला आहे. याबाबत गमरे यांनी तहसील कार्यालयात निवेदन दिले आहे.

रायगड-रत्नागिरी जिल्ह्याला जोडणाऱ्या सावित्री नदीवरील आंबेत-म्हाप्रळ खाडीपुलाशेजारी नवीन पूल बांधावा, रत्नागिरी-रायगड जिल्ह्याचे तत्काळ विभाजन करून नवीन मंडणगड जिल्हा निर्माण करावा, राजेवाडी ते आंबडवे या महामार्गावरील मंडणगड शहरातील चौकात व मंडणगड तहसील कार्यालयासमोर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज या दोन्ही महापुरुषांचे पूर्णाकृती पुतळे बसवावेत, गणेशोत्सवापूर्वी राजेवाडी ते आंबडवे महामार्गावरील मंडणगडच्या हद्दीतील खड्डे त्वरित भरण्यात यावेत, स्मार्टमीटरची मोहीम थांबवावी अशा मागण्या गमरे यांनी निवेदनात केल्या आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर