उमरोली : डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांच्या जन्मदिनी महाराष्ट्र शासनाच्या वतीने शाश्वत शेती दिन म्हणून जाहीर करण्यात आला. हरित क्रांतीचे शिल्पकार म्हणून ओळखले जाणारे डॉ. स्वामिनाथन यांनी भारतीय शेतीच्या क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणले.
त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानासाठी त्यांना पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण, भारतरत्न, तसेच मंडेला मेमोरियल पदक यांसारख्या अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
या विशेष दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद शाळा, उमरोली येथे विद्यार्थ्यांसमवेत त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमात विद्यार्थ्यांना डॉ. स्वामिनाथन यांच्या हरित क्रांतीमधील योगदान, त्याचा शेतकऱ्यांवर झालेला सकारात्मक परिणाम व देशाच्या अन्नसुरक्षेमध्ये झालेली वाढ याबाबत माहिती दिली गेली.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना भविष्यातील शाश्वत शेती बद्दलचे माहिती व नवीन मोठ्या संधी बद्दलचे महत्त्व पटवून देण्यात आले या वेळी जिल्हा परिषद शाळेच्या प्राध्यापिका मोरे मॅडम उपस्थित होत्या.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. निखिल चोरगे, गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संकेत कदम, जिजामाता महिला कृषी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शमिका चोरगे तसेच ग्रामीण कृषी कार्यानुभव समन्वयक प्रा. प्रशांत इंगवले यांचे मार्गदर्शन लाभले.
सदर कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी; आदित्य पाटील,सम्मेद कुंभोजे, सार्थक चंदोबा, प्रणव पाटील,अन्वय धोंडे, प्रथमेश पाटील,रोहन चव्हाण, राजवर्धन पाटील, गणेश जगताप, प्रथमेश सनबे हे कृषिदूत उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:30 08-08-2025












