रत्नागिरी : जिल्ह्यात भटक्या, पिसाळलेल्या कुत्र्यांची दहशत

रत्नागिरी : रत्नागिरी शहरासह जिल्ह्यातील विविध भागात भटक्या, पिसाळलेल्या कुत्र्यांनी मोठी दहशत निर्माण केली आहे. ही भटकी कुत्री झुंडीने फिरत असून चिमुकले, वयोवृद्ध, महिला, तरूर्षीवर हल्ले करीत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. मात्र याकडे स्थानिक प्रशासनासह जिल्हा प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.

२०२४-२५ जूनअखेर वर्षभरात जिल्ह्यातील ६ हजार ८५५ जणांना श्वानदंश झाला असून यामुळे एकाचा मृत्यू झालेला नाही. तर मागील पाच वर्षात १८ हजार ८३८ जणांना श्वानदंश झाला आहे. सर्वाधिक श्वानदंश रत्नागिरी, दापोली, गुहागर, लांजा, कामथे झाले. रत्नागिरी शहरासह विविध तालुक्यातही कुत्र्यांचा सुळसुळाट वाढला आहे. नगरपरिषद, नगरपालिका विभागांनी खबरदारी म्हणून मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, त्यांना पकडून त्यांची नसबंदी करावी अशी मागणी वाढत आहे.

रत्नागिरी शहरासह तालुक्याच्या ठिकाणी मोकाट, कुत्री झुंडीने फिरत असून नागरिकांवर हल्ला करत आहेत

तरुण, रुग्ण, महिलांना शहरात एकटे जात असताना चिमुकले, मोकाट कुत्र्यांनी चावा घेतल्याचा सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाला होता. अनेक गावात कचरा नियमित उचलला जात नाही, कुजलेले अन्न पदार्थ, चिकन, मटण, मच्छी, मासळी, बाजारासमोर टाकाऊ पदार्थ पडत असल्यामुळे कुत्री गर्दी करतात. हॉटेल्स बाहेर ही मोकाट कुत्र्यांची गर्दी वाढली आहे.

लांजा तालुक्यात कुत्र्यांची दहशत
लांजा तालुक्यातील बाजारपेठेत व बसस्थानक, स्मशानभूमी परिसर, मंदिर, दर्गाह परिसर, शाळा, महाविद्यालयासह विविध ठिकाणी कुत्र्यांची दहशत वाढली आहे. झुंडीने फिरत नागरीकांना चावा घेण्याचा प्रकार वाढत आहे. विशेष करून चिमुकल्यावर ही कुत्री हल्ला करीत आहेत.

याठिकाणी कुत्र्यांचा वावर वाढला
रत्नागिरी शहरातील साळवी स्टॉफ, जे.के. फाईल्स, मारुती मंदिर, कोकणनगर पट्टा, मजगाव, जयस्तंभ, एसटी बसस्थानक, मांडवी, कारवांचीवाडी, लक्ष्मी चौक, रेल्वे स्टेशन परिसर, विविध धार्मिक स्थळे, भाजीपाला, फळविक्रेते, चहाची टपरी, चिकन, मटन दुकान, नाट्यगृह, चित्रपट, मांसाहारी हॉटेल्स यासह तालुक्यातील संगमेश्वर, राजापूर, पावस, साखरपा, चिपळूण, दापोली, गुहागर तालुक्यात मोकाट कुत्र्यांनी दहशत माजवली आहे.

दीड हजार भटक्या कुत्र्यांवर नसबंदी
नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाकडून एप्रिल व दोन या दोन महिन्यात १५०० भटक्या कुत्र्यांची नसबंदी केल्याचे आरोग्य निरीक्षक संदेश कांबळे यांनी सांगितले. शहरात अद्याप भटके कुत्रे झुंडीने फिरत आहेत. त्यांना पकडून नसबंदी करावी.

रत्नागिरी जिल्ह्यात वर्षभरात ६ हजारांहून अधिक नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतला आहे. जिल्हा रुग्णालयासह तालुक्याच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले आहे. सिव्हील, जिल्हा रूग्णालयात रेबीज, अँटीरेबीज सिरम ही मोफत दिली जाते. रेबीज इंजेक्शनचासाठा मुबलक प्रमाणात आहे. कुत्र्यांनी चावा घेतल्यास घरगुती उपचाराऐवजी तातडीने डॉक्टरला दाखवावे-डॉ. विकास कुमरे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक, रत्नागिरी

रेबीजचा मोठा धोका
जिल्ह्यात कुत्र्यांच्या झुंडी वाढत असल्यामुळे रेबीजाही मोठा धोका निर्माण झाला आहे. हा आजार कुत्र्यांच्या संक्रमित लाळेतून, विशेषतः चाव्याद्वारे पसरत असून विषाणूजन्य आजार आहे. हा विषाणू थेट मज्जासंस्थेवर हल्ला करत असल्याने, एकदा त्याची लक्षणे (उदा. पाण्याची भीती, वर्तणुकीत बदल) दिसू लागल्यास तो जवळजवळ १०० टक्के प्राणघातक ठरतो. नागरीकांना त्याचा मोठा धोका असून प्रशासनाने तातडीने भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:56 PM 08/Aug/2025