रत्नागिरीत ‘स्मार्ट श्रावण सखी’ स्पर्धेचा जल्लोष, २१ सखी अंतिम फेरीत!

रत्नागिरी : सौंदर्य आणि बुद्धिमत्तेचा अनोखा संगम असलेली ‘स्मार्ट श्रावण सखी’ ही स्पर्धा सध्या रत्नागिरीमध्ये चर्चेचा विषय बनली आहे. उदय सामंत प्रतिष्ठानतर्फे आयोजित या स्पर्धेत विविध क्षेत्रांतील ५४ महिलांनी सहभाग घेतला. या स्पर्धेने महिलांना एक हक्काचे व्यासपीठ दिले, जिथे त्यांनी आपल्या आवडीनिवडी, स्वप्ने आणि आकांक्षा मनमोकळेपणाने व्यक्त केल्या.

ही स्पर्धा केवळ सौंदर्याची नाही, तर आत्मविश्वासाची आणि स्त्रीत्वाच्या उत्सवाची आहे हे स्पर्धकांच्या उत्तरांवरून दिसून आले. “या स्पर्धेतून आम्हाला आत्मविश्वास आणि खूप आनंद मिळाला,” असे एका स्पर्धकाने सांगितले, तर दुसऱ्या एका स्पर्धकाला जेव्हा तिच्यातील वेगळा गुण विचारला, तेव्हा तिने नम्रपणे उत्तर दिले, “सर्वच स्पर्धक इतक्या छान तयार आहेत की माझ्यातला विशेष गुण ओळखणे खरंच कठीण आहे.” ब्युटीशियन, वकील, सरकारी कर्मचारी, सामाजिक कार्यकर्त्या आणि गृहिणी अशा विविध भूमिका पार पाडणाऱ्या या महिलांनी स्वतःला सिद्ध केले.

या स्पर्धेच्या परीक्षक मंडळासमोर ५४ बुद्धिमान आणि सुंदर स्पर्धकांमधून अंतिम फेरीसाठी २१ सखींची निवड करण्याचे कठीण आव्हान होते. पण आता हे आव्हान पूर्ण झाले असून, निवड झालेल्या २१ सखी अंतिम फेरीसाठी सज्ज आहेत.

अंतिम फेरीतील २१ सखींची नावे:

मैथीली संदेश लांजेकर, श्वेतांबरी प्रफुल्ल शिर्के, प्रियदर्शनी लक्ष्मीकांत सावखेडकर, अनघा अमोल नाचणकर, तृप्ती हर्षद रेडीज, ऋतुजा महेंद्रकुमार कदम, जेनी मच्छिंद्र चव्हाण, पूनम नितीन पाटील, श्वेता सुरेश यादव, रिमा अजय देसाई, सौम्या सुधेन्दू घुडे, दिशा संदेश भाटकर, दिपीका दिनेश कुबल, प्रिती प्रशांत रसाळ, कुमुदिनी प्रकाश शेट्ये, अंजनी संदिप तांबे, विजेता विजय मोर्ये, संपदा प्रमोद सावंत, योगिता विजय खांडेकर, समिक्षा संतोष कोळेकर आणि राधिका सुमीत नागवेकर.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:00 08-08-2025