रत्नागिरी : माध्यमिक विद्यामंदिर नाणीज शाळेत कीर्तनसंध्येतून संस्कारांचा संदेश

रत्नागिरी : तालुक्यातील नाणीज येथील माध्यमिक विद्यामंदिर अॅण्ड ज्युनिअर कॉलेजमध्ये समाजशास्त्र विषय समितीच्या वतीने कीर्तनसंध्येचे आयोजन करण्यात आले होते. शालेय जीवनात विद्यार्थ्यांवर योग्य संस्कार होणे हा या उपक्रमाचा उद्देश होता. या दृष्टीने हभप अमृता नवाथ्ये यांना प्रवचनासाठी आमंत्रित करण्यात आले होते.

कार्यक्रमाची सुरुवात उपस्थितांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने करण्यात आली. यावेळी प्राचार्या सावंतदेसाई, हभप. अमृता नवाथ्ये, समाजशास्त्र विषय समितीचे अध्यक्ष यू.पी. पवार, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते.

अमृता नवाथ्ये यांनी संस्कारांचे जीवनातील महत्त्व कीर्तनाच्या माध्यमातून पटवून दिले. त्यांना स्वप्नील परपते, कलाशिक्षक रवींद्र परपते, अनंत साळवी यांनी संगीत साथ केली. यावेळी पी.जी. वाघरे, एस.बी. माने यांचीही उपस्थिती होती.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:11 PM 08/Aug/2025