चिपळूण : लोटिस्माच्या वक्तृत्व स्पर्धेत वेदिका हरवडे, मृण्मयी जोग, स्वराज्य कदम प्रथम

अडरे : येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराने टिळक पुण्यतिथी घेतलेल्या वक्तृत्व स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महाविद्यालयीन गटात वेदिका हरवडे, माध्यमिक गटात मृण्मयी जोग आणि प्राथमिक गटात स्वराज्य कदम यांनी प्रथम क्रमांक मिळवला.

तीन गटात या स्पर्धा घेण्यात आल्या. महाविद्यालयीन गटात आनंदराव पवार महाविद्यालयाच्या वेदिका विष्णू हरवडे प्रथम, डीबीजेची मीरा मनोज पोंक्षे द्वितीय, तर मार्गताम्हाने कॉलेजची सिद्धी विजय लांजेकर तृतीय आली. माध्यमिक गटात प्रथम क्रमांक सती हायस्कूलची मृण्मयी प्रसाद जोग, द्वितीय क्रमांक एसपीएमची स्वरा प्रराग खैर, आणि तृतीय क्रमांक युनायटेडच्या ओवी सागर भावे हिला मिळाला. प्राथमिक गटात युनायटेड स्कूलमधील स्वराज रामकृष्ण कदम, मार्गताम्हानेतील वसंतराव भागवत विद्यालयाची शुभ्रा मिलिंद यादव आणि सती हायस्कूलचा वेदांत महेंद्र महाडीक यांना अनुक्रमे पहिले तीन क्रमांक मिळाले.

परीक्षक म्हणून मुकुंद कानडे, सुनील पाध्ये, संगीता जोशी, माधवी जोशी, अविनाश फडके, शालन रानडे, मांडवकर, अविनाश फणसे, वैशाली चितळे यांनी काम पाहिले. स्पर्धा यशस्वी होण्याकरिता वाचनालयाचे संचालक, पदाधिकारी, स्पर्धा विभाग प्रमुख आराध्या यादव, अनिल धोंड्ये, मधुसूदन केतकर आणि कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या यांचे हस्ते प्रशस्तीपत्रक, रोख रक्कम देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी वाचनालयाचे कार्याध्यक्ष अरुण इंगवले, विनायक ओक, अभिजीत देशमाने, राष्ट्रपाल सावंत उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:18 PM 08/Aug/2025