अडरे : चिपळूण येथील उपविभागीय कार्यालयातील सहायक महसूल अधिकारी शिल्पा श्रृंगारे ऊर्फ गिज्जेवार यांच्या कामकाजाची कोकण विभाग आयुक्त स्तरावर दखल घेण्यात आली. त्यांचा महसूल विभागाचे अपर सचिव विकास खारगे यांच्या उपस्थितीत उकृष्ट सहायक महसूल अधिकारी म्हणून ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात गौरव करण्यात आला.
शिल्पा गिज्जेवार यांनी कुळ वहिवाट कायद्याखालील अर्धन्यायिक कामकाजामध्ये आधुनिक प्रणालीचा वापर करून अशा खटल्यांच्या सुनावणी तारखा, आदेशाची माहिती जनतेला घरबसल्या उपलब्ध करून देण्याबाबत गतिमान कामकाज केले. दैनंदिन कामकाजात ई-ऑफिस प्रणालीचा प्रभावीपणे वापर केला आहे. लोकसभा व विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये उल्लेखनीय कामकाज केले.
विभागीय व राज्यस्तरीय महसूल स्पर्धेत प्रतिनिधित्व करून जिल्ह्याला विजेतेपद व कोकण विभागाला राज्यस्तरावर उपविजेतेपद प्राप्त करून दिले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कामकाजाची दखल घेत त्यांचा गौरव करण्यात आला.
२०२१ मध्ये स्वतः गर्भवती असताना बाजारपेठेतील सर्व पूरग्रस्तांचे पंचमाने व त्यांचे खाते व्यवस्थित तपासून पूरग्रस्तांना नुकसानभरपाई मिळण्यासाठी दिवस-रात्र बिनचूक कामे केली. गेल्या १८ वर्षाच्या कालावधीत त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल शाखा, भूसंपादन, कुळ वहिवाट, तहसीलदार कार्यालय, चिपळूण अशा विविध कार्यालयांत कामकाज केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:29 PM 08/Aug/2025












