रत्नागिरी : पोलिस निरीक्षक सतीश शिवरकर यांची पदोन्नती होऊन रायगड पोलिस मुख्यालय येथे पोलिस उप अधीक्षकपदी बदली झाली आहे. सध्या सतीश शिवरकर हे रत्नागिरी येथील जिल्हा नियंत्रण कक्ष येथे पोलिस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. आठ महिन्यांपूर्वी पोलिस निरीक्षक सतीश शिवरकर यांची पालघरहून रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली होती.
या काळात त्यांनी विधानसभा निवडणूक शांततेत पार पाडण्यात तसेच मिरकरवाडा येथील अनधिकृत बांधकाम हटाव बंदोबस्त करताना चोख कामगिरी पार पाडली होती. १६ जुलै २०२५ रोजी त्यांची शहर पोलिस निरीक्षक पदावरून बदली होऊन जिल्हा नियंत्रण कक्ष येथे पोलिस निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. या नियुक्तीला एक महिना पूर्ण होण्याअगोदरच सतीश शिवरकर यांची पुन्हा बदली होऊन त्यांची पदोन्नती होऊन रायगड पोलिस मुख्यालय येथे पोलिस उप अधीक्षकपदी बदली झाली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
08:35 AM 09/Aug/2025














