चिपळूण : येथील श्री लक्ष्मीनारायण देवस्थान चिपळूण यांच्या वतीने दिनांक ९ ते १६ ऑगस्ट दरम्यान श्रीकृष्ण जन्मोत्सव व श्रीकृष्ण व्याख्यानमाला तसेच पाठांतर स्पर्धा होणार आहे. व्याख्यानमालेचे हे ९७ वे वर्ष आहे.
दि. ९ ते १६ ऑगस्ट सकाळी ८.३० वा. श्रीनाम सप्ताह, रोज सायंकाळी ६ ते ६.३० वा. श्रीराम नामजप होईल. तसेच श्रीकृष्ण व्याख्यानमाला दि. ९ ते दि. १४ ऑगस्ट सायं. ६.३० वा. या कालावधीत होईल. तसेच दि. १० रोजी लक्ष्मीनारायण पाठांतर स्पर्धा सकाळी ९ वा., दि. १२ व १३ रोजी सायंकाळी ६ वा. गुणवंतांचा सत्कार, दि. १५ रोजी श्रीकृष्ण जन्मोत्सव होईल. रात्री १०.३० वा. हभप सौ. आसावरी काळे यांचे कीर्तन होईल. दि. १६ रोजी गोपाळकाला व महाप्रसाद. पहिल्या दिवशी कै. मादुस्कर गुरुजी पारितोषिक वक्त्यांच्या हस्ते देण्यात येईल.
श्रीकृष्ण व्याख्यानमाला अंतर्गत दि. ९ रोजी सायं. ६.३० वा. भाषा व विज्ञान अभ्यास डॉ. अभिदा घुमटकर (मुंबई) यांचे ‘विज्ञानाचा इतिहास’, दि. १० रोजी अभिनेत्री संपदा जोगळेकर-कुलकर्णी यांचे ‘कलेतून आत्मभान’, ११ रोजी लेखिका सुनीताराजे पवार यांचे ‘स्त्री काल, आज आणि उद्या’, दि. १२ रोजी देवराई अभ्यासक डॉ. अर्चना गोडबोले यांचे ‘कोकणातील देवराया : सद्यस्थिती व आव्हाने’, १३ रोजी संत साहित्याच्या अभ्यासक मंजुश्री गोखले यांचे ‘तुकयाची आवली’, दि. १४ रोजी कवयित्री डॉ. निलम माणगावे यांचे व्याख्यान होईल.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
08:45 AM 09/Aug/2025












