तलाठी हजेरीसाठी ‘फेस रेकग्निशन’ अॅप बंधनकारक

रत्नागिरी : राज्यातील महसूल विभागातील तलाठी सर्कल व अन्य महसूल कर्मचाऱ्यांना राज्य शासनाकडून आपल्या नोकरीचे नियुक्त ठिकाणी राहून फेस अॅप हजेरी नोंदणी बंधनकारक केली आहे. त्यामुळे ग्रामीण भागात या पुढील काळात तलाठी, सर्कल यांना दररोज कामाच्या नियुक्ती ठिकाणी हजर राहावे लागणार आहे. परंतु, या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करावी, अशी अपेक्षा ग्रामीण जनतेतून व्यक्त होत आहे. मात्र, महसूल कर्मचाऱ्यांचा यासाठी विरोध होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

राज्याच्या ग्रामीण भागात सर्कल, तलाठी हजर राहत नसल्याच्या तक्रारी सातत्याने होत आहेत. त्यामुळे राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत नुकतीच घोषणा केली की, तलाठी सर्कल व महसूल कर्मचाऱ्यांनी फेस अॅप नोंदणी बंधनकारक आहे.

महसूल विभागातील कर्मचाऱ्यांना ग्रामीण भागात कार्यरत असताना अनंत अडचणींचा सामना करावा लागतो. याशिवाय मोबाईल नेटवर्क व अन्य कारणाने हे शक्य नसल्याचे ते खासगीत बोलत असून शासनाच्या या निर्णयाला विरोध होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे शासनाच्या या निर्णयाची अंमलबजावणी किती ताकदीने होणार, हा प्रश्न आता निर्माण झाला आहे.

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत नुकतीच घोषणा केली असून या योजनेची अंमलबजावणी त्यांनी ऑगस्ट / सप्टेंबर महिन्यापासून करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. परंतु प्रत्यक्षात ऑगस्ट महिना सुरू झाला, तरीही या बाबत ग्रामीण भागात कार्यवाही झाल्याचे दिसून येत नाही. याशिवाय हे अॅप सुरू झाल्यानंतर संबंधित विभागाच्या तलाठी सर्कल व सर्व महसूल अधिकाऱ्यांनी आपली हजेरी रोज सकाळी दिलेले वेळेनुसार लावणे बंधनकारक करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
08:49 AM 09/Aug/2025