मेष: आज आपण कुटुंबीयांसह घरगुती बाबींचा महत्वपूर्ण विचार – विनिमय कराल. घराचा कायापलट करण्याच्या नवीन योजना आखाल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांसह महत्वपूर्ण मुद्दयांवर विचार – विमर्श कराल.
वृषभ: आज विदेशात राहणारे नातलग किंवा मित्र यांच्या कडून सुखद बातमी मिळाल्याने मनाला प्रसन्नता लाभेल. परदेशी जाण्याची इच्छा असणार्या लोकांना आजचा दिवस अनुकूल आहे.
मिथुन: आज एखादी अप्रिय घटना घडण्याची शक्यता आहे. एखादी शस्त्रक्रिया करावी लागेल. रागामुळे स्वतःचीच हानी होण्याची शक्यता असल्याने डोके शांत ठेवा. मानहानी संभवते.
कर्क: समृद्ध जीवनशैली व मनोरंजक वृत्ती ह्यामुळे आज आपण आनंदी राहाल. व्यावसायिक क्षेत्रात लाभ होईल. प्रकृती उत्तम राहील. मान – प्रतिष्ठा वाढेल. एखाद्या प्रवासाचा बेत आखू शकाल.
सिंह: आज आपले मन चिंतेने व्यग्र असेल. एक प्रकारची उदासीनता येईल. दैनंदिन व्यवहारात विघ्न येऊ शकतात. सहकार्यांचे सहकार्य आज अजिबात मिळणार नाही.
कन्या: आजचा दिवस विद्यार्थ्यांसाठी प्रतिकूल आहे. संतती विषयी चिंता लागून राहील. सट्टा – शेअर बाजार ह्यात सावध राहून व्यवहार करावेत. मन दु:खी असेल.
तूळ: मनात हळवेपणा जास्त प्रमाणात राहील. शारीरिक उत्साहाचा अभाव जाणवेल. मानसिक तणाव सुद्धा असेल. धनाची तसेच कीर्तीची हानी होईल. आईच्या प्रकृतीची काळजी राहील.
वृश्चिक: आर्थिक लाभ होतील. नशिबाची साथ मिळेल. मित्रां बरोबरच्या संबंधात सौहार्दता असेल. नवीन कार्य सुरू करण्यासाठी आज अनुकूलता लाभेल. एखादा प्रवास ठरवाल.
धनु: काही गैरसमजामुळे निर्णयाप्रत जाणे अवघड होईल. मन दुःखी राहील. कुटुंबियांशी मतभेद संभवतात. कामात अपेक्षित यश न मिळाल्याने मन निराश होईल.
मकर: आज एखादे मंगलकार्य आपण करू शकाल. वातावरण मंगलमय बनेल. मित्र, स्नेही यांच्याकडून आपणास भेटवस्तू मिळतील. व्यापार- व्यवसायात आपले वर्चस्व राहील.
कुंभ: कुटुंबियाशी मतभेद संभवतात. आर्थिक देवाण – घेवाण किंवा गुंतवणूक करताना सावध राहावे. कोर्टाच्या कामात सुद्धा सावध राहावे लागेल. खर्च वाढेल.
मीन: संतती कडून चांगली बातमी मिळेल. बालपणीचे किंवा जुने मित्र भेटल्याने आनंदीत व्हाल. नवीन मित्रांशी सुद्धा संपर्क होईल व त्याचा भविष्यात फायदा होईल.
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. रत्नागिरी खबरदार यातून कोणताही दावा करत नाही. )
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:08 09-08-2025














