जाकादेवी : रत्नागिरी येथे झालेल्या तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत मालगुंड एज्युकेशन सोसायटीच्या बळीराम परकर विद्यालय व मुरारी तथा भाई मयेकर ज्युनियर कॉलेजमधील १४ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांचा संघ उपविजेता ठरला.
ही स्पर्धा क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी व जिल्हा क्रीडा परिषद रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम रत्नागिरी येथे क्रीडा तालुका समन्वयक विनोद मयेकर यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. या स्पर्धेत मालगुंड शाळेचा १४ वर्षांखालील वयोगट खो-खो संघ सहभागी झाला होता. या स्पर्धेत रत्नागिरी तालुक्यातून सोळा संघ सहभागी झाले होते. स्पर्धेत अतिशय उत्कृष्ट कामगिरी करत उपविजेतेपद पटकावले.
खेळाडूंनी मिळविलेल्या या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन बंधू मयेकर, उपाध्यक्ष विवेक परकर, सचिव विनायक राऊत, खजिनदार संदीप कदम, मुख्याध्यापक विपिन परकर यांनी अभिनंदन केले, सर्व खेळाडूंना क्रीडा शिक्षक संजय थोरात, रुपेश तावडे, सुनील मोडक यांचे मार्गदर्शन लाभले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:11 PM 18/Oct/2024














