अपघातात जखमी तरुणाचे निधन

चिपळूण : दुचाकी घसरून जखमी झालेल्या संगमेश्वर येथील एका अपघातग्रस्ताचे पिंपरी (पुणे) येथे उपचारादरम्यान निधन झाले.

या संदर्भात चिपळूण पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, सखाराम बोडेकर (वय ४०, रा. तळवडे, हरपुडे, ता. संगमेश्वर) हा १६ जुलैला सायंकाळी साडेसात वाजता दुचाकीवरून सावर्डे येथून जात असताना त्याची दुचाकी घसरली. या अपघातात बोडेकर याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याला अधिक उपचारासाठी प्रथम कराड नंतर पुणे येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना त्याचे निधन झाले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:41 09-08-2025