चिपळूण : वहाळफाटा येथील सर्व्हिस रोडवर वाहतुकीला अडथळा निर्माण होईल, अशा ठिकाणी वाहन उभे केल्याप्रकरणी असुर्डे कासारवाडी येथील एका व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे.
सावर्डे पोलिस ठाण्यातील कर्मचारी सुनील भांगरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दिलीप शांताराम नरोटे (वय ५५) याने ७ ऑगस्टला दुपारी दीड वाजता सावर्डे-वहाळफाटा येथील सेवारस्त्यावर त्याचे वाहन (एमएच ४६, झेड ४८६१) वाहतुकीला अडथळा होईल अशा ठिकाणी उभे केले होते म्हणून त्याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:41 09-08-2025












