रत्नागिरी : हातभट्टीची दारूविक्रीवर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत ५८० रुपयांची पाच लिटर दारू जप्त केली. देवरूख पोलिस ठाण्यात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रोशन सुरेश रसाळ (वय ४३, रा. निवे बुद्रुक, सरोदेवाडी, ता. संगमेश्वर) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता. ७) दुपारी पावणेएकच्या सुमारास निवेबुद्रुक सरोदेवाडी येथील घराच्या पाठीमागे घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संशयित हा विनापरवाना हातभट्टीची दारू विक्री करत असताना सापडला. या प्रकरणी महिला पोलिस कॉन्स्टेबल मंजुश्री पाडावे यांनी देवरूख पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:41 09-08-2025












