हातखंबा-तिठा येथून डंपर चोरीला

रत्नागिरी : तालुक्यातील हातखंबा-तिठा येथील सिद्धगिरी मंगल कार्यालय येथील एका कंपनीसमोर पार्क केलेला डंपर चोरट्याने पळवला. ग्रामीण पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना ३ ते ४ ऑगस्ट या कालावधीत घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी मोहाफीज रियाज अहमद टंकसाली (वय ३०, रा. कलामुर्ती गल्ली चिकोडी, बेलगाव, राज्य कर्नाटक) यांच्या मालकीचा डंपर त्यांचा चालक यासीन ताजुद्दीन मणेर याने हातखंबा तिठा सिद्धगिरी मंगल कार्यालय, एमएमटी लॉजिस्टिक्स कंपनी येथे पार्क करून ठेवलेला होता. चोरट्याने तो पळवला. या प्रकरणी मोहाफीज टंकसाली यांनी तक्रार दिली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:47 09-08-2025