खेड : एसटीच्या रत्नागिरी विभाग नियंत्रक व विभागीय वाहतूक अधिकारी यांनी कारभारात सुधारणा केलेली नाही. त्यामुळे स्वातंत्र्यदिनी (ता. १५) रत्नागिरी येथील विभाग नियंत्रक कार्यालय येथे आत्मदहन करणार असल्याचा इशारा तुळशी बुद्रुक येथील सेवानिवृत्त पदवीधर शिक्षक मोहन गोविंद उपानेकर यांनी दिला आहे. दोन ऑगस्टला खेड-तुळशी-महाड या मार्गावरील खेड-बोरिवली रातराणी, खेड-ठाणे-नालासोपारा, खेड-विठ्ठलवाडी या गाड्यांना चांगले उत्पन्न असूनही केवळ सणाच्या कालावधीत या गाड्या चालवल्या जातात. सण संपला की, गाड्या बंद होतात. उत्पन्न चांगले असूनही या गाड्या बारमाही केल्या जात नाहीत.
यापूर्वी असलेले खेडचे आगार व्यवस्थापक करवंदे यांनी खेड-बोरिवली आणि खेड-तुळशी या दोन गाड्या त्यांच्या अधिकार कक्षेमध्ये बारमाही केल्या, खेड-बीड व खेड-बोरिवली या गाड्या संघटनेच्या पुढाऱ्यांचे ऐकून बारमाही झाल्या; परंतु वरील तीन गाड्या बारमाही का होत नाहीत? एसटी प्रशासनाच्या या अशा कारभाराला आम्ही कंटाळलो आहोत. त्यामुळे १५ ऑगस्टला रत्नागिरी विभागीय कार्यालय येथे आत्मदहन करणार असल्याचे निवेदन उपानेकर यांनी दिले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:50 AM 09/Aug/2025














